Home महाराष्ट्र शरद पवारांना जर पंतप्रधान व्हायचं असेल, तर त्यांनी…; सुधीर मुनगंटीवार यांचा उपरोधक...

शरद पवारांना जर पंतप्रधान व्हायचं असेल, तर त्यांनी…; सुधीर मुनगंटीवार यांचा उपरोधक सल्ला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शरद पवार यांना पंतप्रधान तर, अजित पवार यांना एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचे आहे, अशी इच्छा राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी काल चिंचवड येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलून दाखवली. त्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देत शरद पवारांवर निशाणा साधला.

शरद पवारांना पंतप्रधान केलं पाहिजे. अजित पवारांना मुख्यमंत्री केलं पाहिजे. राजकारणात इच्छा असणं गैर नाही. पण, त्या इच्छेसाठी जे कष्ट परिश्रम करावे लागतात., असा टोला मुनगंटीवार यांनी पवार कुटूंबियांना यावेळी लगावला.

दरम्यान, शरद पवारांचा परिवार म्हणजे माझी मुलगी खासदार, माझा पुतन्या उपमुख्यमंत्री, माझा नातु आमदार असा आहे. शरद पवारांना खरंच पंतप्रधान व्हायचं असेल तर, सर्व नातेवाईकांचा आधी त्यांनी राजीनामा घ्यावा तरच, पंतप्रधान पदाचा दरवाजा उघडला जाऊ शकतो, अन्यथा शरद पवारांचं स्वप्न स्वप्नच राहील, असा सल्ला मुनगंटीवार यांनी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

माझ्या मुलीच्या पराभवामागे गिरीश महाजनांचा हात; एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; देगलूरसाठी शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला भाजपकडून उमेदवारी

काँग्रेसमध्ये इन्कमिंगला सुरुवात; ‘या’ मोठ्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

राष्ट्रवादीने अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची संधी द्यायला हवी- चित्रा वाघ