आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पालघर : जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपची युती होणार की नाही याकडे सर्वाधिक लक्ष लागलं आहे. मात्र असं असताना पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भाजप आणि मनसेची पहिली युती झाली आहे. तर मोखाडा येथे मनसेने आपले दोन उमेदवार उभे केले आहेत. या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे शिलेदार कामाला लागले आहेत.
पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे पुर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे. ठाणे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मोखाडा येथे तळ ठोकून आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो नागरिक प्रचारात सहभागी होत आहेत.
दरम्यान, ठाण्यातील जे मंत्री आपल्या घराबाहेरचे रस्ते दुरूस्त करु शकत नाही, ते पालघर, जव्हार आणि मोखाड्याच्या विकासाचे आश्वासन देत आहेत. त्यांनी आधी आपल्या घराबाहेरचे रस्ते दुरूस्त करावे आणि मग या भागाचा विकास करण्याचे आश्वासन द्यावे, असं सागंतानाच आमचे उमेदवार उच्चशिक्षित असून, राज ठाकरे यांच्या विचारण्यावर चालणारे आहेत. त्यामुळे तरुणांनी आपल्या भागाचा विकास साध्य करण्यासाठी मनसेच्या उमेदवारांना मत द्यावी, आमचे उमेदवार निवडून आल्यास, आदिवासी भागात शिक्षणासाठी मोठी योजना राबवू, असं आश्वासन अविनाश जाधव यांनी मतदारांना दिलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“…म्हणून मी फडणवीसांना म्हणालो होतो, काहीही करा, पण शरद पवारांचा नाद करू नका”
जेव्हा निवडणूक लागेल, तेव्हा…; अशिष शेलारांचा अजित पवारांना इशारा
“मुख्यमंत्री पदावर असो वा नसो, आजही शेतकऱ्यांना फडणवीसांचा आधार वाटतो”
कंगना रणौतने घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट; चर्चांना उधान