आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेत्यांसाठी एक वर्षाचा कार्यकाळ ठरवून देण्यात आला होता. हा कालावधी आता संपला असून पक्षाकडून या जागेवर कोणाला संधी देण्यात येईल. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विद्यमान विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांचा राजीनामा घेऊन या जागेवर एका महिला नेत्याला संधी देण्यात येणार असल्याची चर्चा राष्ट्रवादीत सुरु आहे.
दरम्यान, पक्षातर्फे यंदा विरोधी पक्षनेत्यापदी एका महिलेले संधी दिली जावी, असा सूर महिला नगरसेविकांमध्ये आहे. तर मागील वेळी दावेदार असलेले भोसरीतील अजित गव्हाणे या तरुण चेहऱ्याला ही संधी मिळू शकते. महिला नगरसेविका म्हणून माजी महापौर वैशाली घोडेकर यांचे नावही चर्चेत असल्याची माहिती आहे.
महत्वाच्या घडामोडी –
एकनाथ खडसेंनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवले कसे?; गिरीश महाजन यांचा सवाल
शरद पवारांवर असलेल्या प्रेमापोटी अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत- जयंत पाटील
विधानसभा निवडणुका कधीही होवो, स्वबळावर लढण्यास भाजप सज्ज- चंद्रकांत पाटील
ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयावरुन मनसे आक्रमक; न्यायालय, राज्यपालांकडे दाद मागणार