आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पंजाबमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून राजीनामा दिल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनीही आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षात राहणार नसल्याचंही स्पष्ट केलं. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्ष हेडलेस झाला आहे. त्याचा भाजप फायदा घेत आहे. त्यामुळे काँग्रेसने अध्यक्षपदाचा विषय मार्गी लावावा, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला. ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, जोपर्यंत काँग्रेस पक्षाला कोणी अध्यक्ष नियुक्त केला जात नाही, तोपर्यंत आज जो काही गोंधळ सुरू आहे तो थांबणार नाही असं माझ्यासारख्या राजकीय विश्लेषकाला वाटतं. तसेच काँग्रेस देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. तो राहील. भविष्यात राजकारण करताना काँग्रेस शिवाय राजकारण करता येणार नाही. पण काँग्रेस नेतृत्वाने अध्यक्षपदाचा विषय लवकरात लवकर मार्गी लावला तर विरोधी पक्षाच्या आघाडीला पुढे जाता येईल, असंही संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“पवारसाहेबांना पंतप्रधान, तर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचंय, त्यांना पुण्यात गुंतवू नका”
“किरीट सोमय्यांनी लायकीत रहावं, केंद्रातली सत्ता गेल्यावर परदेशात पळून जायची वेळ येईल”
खडसे साहेब, एखादा शूटर लावून मला मारुन टाका; आमदार चंद्रकांत पाटलांच मोठ वक्तव्य
“कोण नाना अन् कोण दादा, हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल”