जळगाव : जळगावात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता टीका केली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना उत्तर देताना एखादा शूटर लावून मला मारून टाका, असं वक्तव्य आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
एकनाथ खडसे यांनी माझ्या संदर्भात लेव्हल सोडून बोलू नये, एकनाथ खडसे यांनी लेव्हल सोडल्यास मी देखील लेव्हल सोडून बोलेन. मी एकनाथ खडसे यांचा कधीही अनादर केला नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी तोंडाला कुलूप लावावे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
एकनाथ खडसे हे मी युती तोडली असं अहंकाराने आजही ते सांगतात. पण सध्या एकनाथ खडसे यांचं डोकं ठिकाणावर नाही. पक्ष बदलल्यानंतरदेखील एकनाथ खडसे यांना अजूनपर्यंत काही मिळाले नाही. त्यातच भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंना कधी लपावं लागतं, तर कधी पळावं लागतं अशी परिस्थिती आहे. त्यांना तीन तीन वेळा कोविड त्यांना होतो, त्यामुळे त्यांच्याविषयी मला सहानुभूती आहे” अशी टीका शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
“कोण नाना अन् कोण दादा, हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल”
किरीट सोमय्यांवर आता अनिल परब पडले भारी; सोमय्यांना न्यायालयाकडून समन्स
मुंबईत मनसेला मिळालं अधिक बळ ; शेकडो कामगारांचा मनसेत प्रवेश
मास्तरांच्या मुलाने 1200 कोटीची संपत्ती जमवली, त्यांची कशी चाैकशी होत नाही?; एकनाथ खडसेंचा सवाल