आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अकोला : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कंबर कसताना दिसत आहे. पटोले यांनी अकोला येथे जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या जोरदार प्रचार केला. यावेळी ‘दादापेक्षा नाना मोठा असतो,’ अशी अप्रत्यक्षपणे टोलेबाजी अजित पवारांवर केली. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“नाना पटोले हे मोठे नेते आहेत. त्यांनी कोणता अर्थ काढला हे माहीत नाही. पण, माझापेक्षा लहान असलेला तरुण वर्ग आदराने मला दादा म्हणतो. माझ्यापेक्षा ते मोठे आहेत. नाना पटोले हे कुठल्या दादांपेक्षा मोठे असूच शकत नाहीत. हे त्यांना आणि त्यांच्या पक्षाला चांगले माहीत आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
दरम्यान, कोण मोठं हे येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच माहीत पडेल. कोण नाना अन् कोण दादा, हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल.” असं आव्हानही मिटकरींना नाना पटोले यांना दिलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
किरीट सोमय्यांवर आता अनिल परब पडले भारी; सोमय्यांना न्यायालयाकडून समन्स
मुंबईत मनसेला मिळालं अधिक बळ ; शेकडो कामगारांचा मनसेत प्रवेश
मास्तरांच्या मुलाने 1200 कोटीची संपत्ती जमवली, त्यांची कशी चाैकशी होत नाही?; एकनाथ खडसेंचा सवाल
“किरीट सोमय्यांची आता थेट विश्वास नांगरे पाटील यांच्याविरोधात तक्रार”