Home महाराष्ट्र मुंबईत मनसेला मिळालं अधिक बळ ; शेकडो कामगारांचा मनसेत प्रवेश

मुंबईत मनसेला मिळालं अधिक बळ ; शेकडो कामगारांचा मनसेत प्रवेश

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने  कंबर कसली आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे हे स्वतः या निवडणुकीसाठी रणनीती आखत सामान्य लोकांना मनसेसोबत जोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून, आज मुंबई शहरातील विविध प्रभागातील असंख्य वाहन चालक व स्वच्छक कामगारांनी मनसेचा झेंडा हाती धरत प्रवेश केला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेते अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी हा पक्षप्रवेश केला. कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनात या कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेत प्रवेश केला. यावेळी मनकासे चिटणीस केतन नाईक, निलेश पाटील आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

दरम्यान, महापालिकेत हे लोक सत्तेत असेपर्यंत असेच हाल होत राहणार. मात्र आता जनता यांना होणाऱ्या निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अमित ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला.

महत्वाच्या घडामोडी –

मास्तरांच्या मुलाने 1200 कोटीची संपत्ती जमवली, त्यांची कशी चाैकशी होत नाही?; एकनाथ खडसेंचा सवाल

“किरीट सोमय्यांची आता थेट विश्वास नांगरे पाटील यांच्याविरोधात तक्रार”

कार्यकर्त्यांचा अपमान मला मान्य नाही, काहीही अडचण आली तर मला फोन करा- जयंत पाटील

जोपर्यंत हे लोक सत्तेत आहेत, तोपर्यंत रस्ते सुधारणार नाहीत; अमित ठाकरे पुन्हा शिवसेनेवर बरसले