Home महाराष्ट्र जोपर्यंत हे लोक सत्तेत आहेत, तोपर्यंत रस्ते सुधारणार नाहीत; अमित ठाकरे ...

जोपर्यंत हे लोक सत्तेत आहेत, तोपर्यंत रस्ते सुधारणार नाहीत; अमित ठाकरे पुन्हा शिवसेनेवर बरसले

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : चांगले रस्ते बांधणे हे काही रॉकेट सायन्स नाही, गेली 25 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना हे काम का जमत नाही? असं म्हणत  रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुन्हा सत्ताधारी शिवसेनवर संताप व्यक्त केला आहे.

राजसाहेबांकडे इच्छाशक्ती होती म्हणून नाशिकमध्ये चांगले रस्ते बांधले गेले. तिथल्या रस्त्यावर एकही खड्डा दिसत नाही. मग गेली 25 वर्ष मुंबईची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांना हे का जमत नाही? जोपर्यंत हे लोक सत्तेत आहेत, तोपर्यंत आपले रस्ते सुधारणारच नाहीत, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.

तुम्हाला न सांगता ठेकेदार रस्ते बांधतात का? काम देताना ठेकेदाराकडे पाहिले जात नाही का? फक्त कारवाई करु, असे आश्वासन दिले जाते. खड्ड्यांमुळे लोकांचा जीव जात आहे. एक वडील त्यांचा मुलगा खड्ड्यात पडल्याने मृत पावले म्हणून ते खड्डे बुजवत फिरतात. जोपर्यंत हे सत्तेत आहेत तोपर्यंत काही होणार नाही. त्यामुळेच रस्त्याने जाऊन वेळ घालवण्यापेक्षा लोकलने प्रवास केला. नाशिकमध्ये रस्ते चांगले मग मुंबईत रस्त्यांची दुरवस्था का? कारवाईचे नाटक केवळ लोकांना दाखवण्यापुरतेच का? असंही अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

देवेंद्र फडणवीसांचं ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य सत्यात कधी येणार; जयंत पाटलांचा टोला

आम्ही निर्लज्जांना शिवसेनेत घेत नाही; संजय राऊतांचा टोला

दोन पक्षांचे आपल्याला संकेत, राज्यात केंव्हाही निवडणुक लागू शकते; आशिष शेलारांनी टाकला बाॅम्ब

…तर नाना पटोले अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष संदर्भातही बोलू शकतात; देवेंद्र फडणवीसांचा टोला