Home महाराष्ट्र आम्ही निर्लज्जांना शिवसेनेत घेत नाही; संजय राऊतांचा टोला

आम्ही निर्लज्जांना शिवसेनेत घेत नाही; संजय राऊतांचा टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही महिन्यांवर राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत. सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेनेनंही आता गोव्याच्या राजकीय मैदानात उतरणार असल्याचं जाहीर केलं आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे.

गोव्यात आम्ही स्वबळावर निवडणूक लढणार असून युती आणि आघाडीचे राजकारण आम्हाला करायचे नाही. तसेच आम्ही निर्लज्जांना शिवसेनेत घेत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, निर्लज्ज राजकारणी एका पक्षातून निवडून येतात आणि दुसऱ्या पक्षात जातात. सध्या गोव्यातही तेच चित्र पाहायला मिळत आहे . हे पाहता गोव्याचे राजकारण निर्लज्जतेच्या पातळीवर गेले आहे. या घडामोडींना आळा घालण्याचे काम जनतेलाच करावे लागेल, असंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

दोन पक्षांचे आपल्याला संकेत, राज्यात केंव्हाही निवडणुक लागू शकते; आशिष शेलारांनी टाकला बाॅम्ब

…तर नाना पटोले अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष संदर्भातही बोलू शकतात; देवेंद्र फडणवीसांचा टोला

गुलाब चक्रीवादळामुळं समजलं, गुलाबरावांच्या डोक्यात किती दुष्काळ आहे; मनसेचा पलटवार

“पंकजा मुंडे म्हणाल्या, जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले, धनंजय मुंडे म्हणतात, तुम्ही तर…”