Home महाराष्ट्र गुलाब चक्रीवादळामुळं समजलं, गुलाबरावांच्या डोक्यात किती दुष्काळ आहे; मनसेचा पलटवार

गुलाब चक्रीवादळामुळं समजलं, गुलाबरावांच्या डोक्यात किती दुष्काळ आहे; मनसेचा पलटवार

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं असून याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली आहे. यावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे मोठं काम केलं नाही, असा टोला गुलाबराव पाटलांनी यावेळी लगावला. यावरून आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी प्रतिक्रिया देत गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे समजलं की गुलाबरावांच्या डोक्यात किती दुष्काळ आहे ते.राजसाहेब यांनी केलेली मागणी सध्याच्या परिस्थितीत अतिशय योग्य आहे.पण संवेदनाहीन गुलाब ना शेतकऱ्यांचं नुकसान कसं दिसणार?भ्रष्टाचाराचा महापूर आणि अकलेचा दुष्काळ,असले नेते आपल्याला मिळाले हेच तर आपलं दुर्दैव आहे, असं ट्विट करत अमेय खोपकरांनी गुलाबराव पाटलांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“पंकजा मुंडे म्हणाल्या, जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले, धनंजय मुंडे म्हणतात, तुम्ही तर…”

“काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी दिली असेल”

ऋतुराज-डू प्लेसिसची शानदार खेळी; हैदाराबादवर 6 विकेट्सनी विजय, प्लेऑफमध्येही मिळवलं स्थान

नारायण राणे यांनी लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले…