आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मराठवाड्यात झालेल्या तुफान पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधाला होता.
नागरिकांना केलेल्या मदतीच्या आश्वासनाचं काय झालं हा माझा प्रश्न आहे. पालकमंत्री जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पुण्याला रवाना झाले, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. यावरून आता धनंजय मुंडेंनी पलटवार केला आहे.
त्याच अनेक दिवस अमेरिकेत गायब होत्या. त्यांना माहित नाही या पावसाळ्यात बीड जिल्ह्यात 11 वेळा ढगफुटी झाली. त्या प्रत्येकवेळी आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर होतो. आताच्या अतिवृष्टीतही मी मंत्रीमंडळ बैठकीला हजर न राहता बीडमध्ये रात्री लोकांच्या मदतीसाठी गेलो होतो. रात्री अनेक लोकांना पुरातून आम्ही बाहेर काढले, असं धनंजय मुंडे म्हणाले.
दरम्यान, सांगली, कोल्हापुरात पूर आला त्यापेक्षा वाईट परीस्थिती आहे. सरसकट तातडीने मदत मिळावी अशी मागणी आम्हीही केली आहे, असंही धनंजय मुंडेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी दिली असेल”
ऋतुराज-डू प्लेसिसची शानदार खेळी; हैदाराबादवर 6 विकेट्सनी विजय, प्लेऑफमध्येही मिळवलं स्थान
नारायण राणे यांनी लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले…
राज ठाकरेंच्या पत्राची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल; कार्यालयाने दिलं ‘हे’ उत्तर