आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
IPL 2021। इंडियन प्रीमीयर लीग 2021 हंगामातील 44 वा सामना सनरायझर्स हैदाराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात झाला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 6 विकेट्सने विजय मिळवला.
चेन्नईचा हा 11 सामन्यांतील 9 वा विजय ठरला. त्यामुळे चेन्नई 18 गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. आयपीएल 2021 हंगामात प्ले ऑफसाठी पात्र ठरणारा चेन्नई पहिला संघ ठरला आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघाने 20 षटकांत 7 बाद 134 धावा केल्या होत्या. तसेच चेन्नई सुपर किंग्स संघाला विजयासाठी 135 धावांचं आव्हान दिले होते. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्सने 19.4 षटकांत 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
सनरायझर्स हैदराबाद दीलेल्या 135 धावांचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिसने चांगली सुरुवात केली होती. या दोघांनी चेन्नईला अर्धशतकी सलामी दिली. मात्र, ऋतुराजला जेसन होल्डरने 11 व्या षटकात बाद केले. ऋतुराजने 38 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 45 धावांची खेळी केली.
ऋतुराज बाद झाल्यानंतर डू प्लेसिसने मोईन अलीसह डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोईन 15 व्या षटकात 17 धावांवर त्रिफळाचीत झाला. सुरेश रैनाही फार काळ टीकू शकला नाही. त्यांनतर होल्डरने डू प्लेसिसलाही सिद्धार्थ कौलकरवी झेलबाद केले. अखेर अंबाती रायडू आणि एमएस धोनीने चेन्नईला विजय मिळवून दिला
दरम्यान, हैदराबादकडून या सामन्यात जेसन होल्डरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर, राशिद खानने 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी –
नारायण राणे यांनी लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले…
राज ठाकरेंच्या पत्राची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल; कार्यालयाने दिलं ‘हे’ उत्तर
भाजप-मनसे संभाव्य युतीवर नाना पटोलेंचं मोठं विधान; म्हणाले…
“महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही चांगली कामगिरी करणारं सरकार शिवसेना देणार”