Home महाराष्ट्र राज ठाकरेंच्या पत्राची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल; कार्यालयाने दिलं ‘हे’ उत्तर

राज ठाकरेंच्या पत्राची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल; कार्यालयाने दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं असून याचा सर्वांत मोठा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे.राज ठाकरेंच्या या पत्राची तत्काळ दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने एका ओळीत उत्तर दिलं आहे.

राज ठाकरेंचे पत्र मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याला उत्तर देण्यात आलं आहे.ई-मेल मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त झाला असून तो पुढील कार्यवाहीसाठी कृषी तसेच मदत व पुनर्वसन विभागास पाठवण्यात आला आहे, असं उत्तर मुख्यमंत्री कार्यालयाने दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भाजप-मनसे संभाव्य युतीवर नाना पटोलेंचं मोठं विधान; म्हणाले…

“महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही चांगली कामगिरी करणारं सरकार शिवसेना देणार”

काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याकडून संघ आणि भाजपचं कौतुक

मनसेसोबत राज्य स्तरावर युती; चंद्रकांत पाटलांचं मोठ वक्तव्य