Home महत्वाच्या बातम्या मनसेसोबत राज्य स्तरावर युती; चंद्रकांत पाटलांचं मोठ वक्तव्य

मनसेसोबत राज्य स्तरावर युती; चंद्रकांत पाटलांचं मोठ वक्तव्य

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हापरिषदेच्या निवडणुकीसाठी युती करण्यावर दोन्ही पक्षांनी निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप-मनसे युती हा सामान्य विषय नाही. माझी आणि राज ठाकरे यांची भेट अचानक झाली. नाशिकमध्ये अचानक आम्ही ऐकमेकांच्या समोर आलो. जसे दोन हिंदू मानस चहासाठी भेटतात त्याप्रमाणे मी राज ठाकरेंना भेटलो. याचा मनसे आणि भाजपा युती होण्याचा काहीही सबंध नाही, असा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

युती ही स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार ठरत असते. मनसेसोबत राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर युती करण्याचा निर्णय घेण्यासाठी एक ऑथोरिटी असते. ती ऑथोरिटी यासंदर्भात विचार करेल. पण एखाद्या जिल्ह्यात गरजेनुसार कोणाचीही कोणाशी युती होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काहीही बंधन नसतात. भूतकाळात अनेक ठिकाणी भाजपा-राष्ट्रवादीची युती झालेली आहे. पालघर जिल्ह्यात झालेली युती स्थानिक आवश्यकता असेल म्हणून झाली याचा अर्थ हा आता कॉमन पॅटन झाला असे नाही, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

नागपुरात शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; समर्थकांसह पदाधिकाऱ्याचा शिवसेनेत प्रवेश

खड्ड्यात गेलेल्या पक्षानं आम्हांला खड्ड्यात घालण्याची भाषा करू नये; शिवसेनेचा पलटवार

राज ठाकरेंनी मागणी करून काही मोठं काम केलं नाही- गुलाबराव पाटील

“राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच; भाजपच्या ‘या’ आमदाराचा असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश”