मुंबई : राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला होता. मुंबई महापालिका सोडून इतर महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पुरजोर विरोध केला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णयावर ठाम राहत तसा अध्यादेश काढला आहे.
काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महापालिका निवडणूक प्रभाग पद्धतीवर चर्चा झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 सदस्यीय प्रभाग पद्धतीची मागणी लावून धरण्यात आली होती. मात्र, शेवटी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर त्याबाबतचा अध्यादेशही जारी करण्यात आला. आता तो अध्यादेश राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, हा अध्यादेश आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला असून राज्यपाल कोश्यारी या अध्यादेशावर स्वाक्षरी करणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
काँग्रेसला मोठा धक्का; 11 समर्थक दिल्लीकडे रवाना, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सत्ताधारी वाघाचा वाटा खात आहेत; मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल
“लायकीत रहायचं, अन् दम असेल तर समोर या, शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ”
भाजपचा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न; भरवले जाणार खड्ड्यांचे चित्रप्रदर्शन