आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात भाजपा-मनसे युतीबाबत राजकीय वर्तुळात अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत या युतीचा मुहूर्त निघाला असं दिसतंय.
पालघर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत भाजपा-मनसेच्या युतीबाबत भाजपाचे पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी अधिकृत घोषणा केली. यानंतर पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिका अशा चार निवडणुकीत भाजपा-मनसे युती होण्याची शक्यता वाढली आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे गेल्या काही महिन्यांत सतत नाशिकचे दौरे करत आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये भाजपा -मनसेची युती होऊ शकते. तर कल्याण-डोंबिवलीत भाजपाचे 2, तर मनसेचा 1 आमदार आहे. या भागातही मनसेची दखल घेण्याइतकी ताकद आहे. त्यामुळे भाजपा आणि मनसेचे कार्यकर्ते युतीसाठी अनुकूल आहेत.
दरम्यान, नाशिक महापालिकेत 2012 मध्ये मनसेची सत्ता होती 2017 मध्ये भाजपाने स्वबळावर सत्ता मिळवली. आजही नाशकात मनसेची ताकद आहे. तिथे भाजपा-मनसेचे नेते युतीबाबत चाचपणी करत आहेत. बंद दाराआड बैठका सुरू आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
ईडीची नोटीस अनिल परबांना अन् छातीत धडकी उद्धव ठाकरेंच्या; नितेश राणेंचा टोला
जावयाचं नाव सातत्याने घेऊ नका; हसन मुश्रीफांचा किरीट सोमय्यांना इशारा
मुंबईतील खड्ड्यांवरुन किशोरी पेडणेकरांनी अधिकाऱ्यांना झापलं, निलेश राणे म्हणाले…
“मोठी बातमी! नवज्योत सिंग सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा”