मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य तसंच इतर आवश्यक सेवा सुरु राहतील. मात्र ते वगळून पूर्ण संचारबंदी असेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
जनता कर्फ्यूला राज्यातील जनतेने रविवारी चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी आभार मानतो. पण टाळया किंवा थाळया वाजवून हा करोना विषाणू जाणार नाही. टाळया, थाळया वाजवणं ही पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस हे आपल्या जीवाची बाजी लावून लढतातयत त्यांच्याप्रती ती कृतज्ञतेची भावना होती, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे
दरम्यान, येणारे 10 ते 15 दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. या काळात आपण शासनाने दिलेल्या आदेशानुसार घरात बसावं, असंही आवाहनहि उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं.
महत्वाच्या घडामोडी-
महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
…तर राज्यात संचारबंदीही लागू केली जाईल- अजित पवार
राज्यात रक्तसाठ्याचा तुटवडा; रक्तदान करा आरोग्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन
मुख्यमंत्री अतिशय चांगंल काम करत आहेत; राज ठाकरेंनी केलं उद्धव ठाकरेंच कौतुक