आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : राज्यात आगामी काळात महानगरपालिकेसाठी निवडणुका होत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची परिसंवाद यात्रा पैठणला पोहचली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीबाबत महत्वाचं विधान केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मार्गदर्शनामुळेच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. आज राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र काम करताना दिसत आहेत. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तीन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असावा तरच सरकार म्हणून आपल्याला संपूर्ण मदत होईल, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
एक वेळ असा होता की, आपल्या पक्षात कोणी थांबत नव्हते, लोक पक्ष सोडून जात होते. 2019च्या निवडणुकीत पक्षाची परिस्थिती बिकट होती. परंतु पवारसाहेबांच्या झंझावती दौऱ्यांमुळे आपली संख्या 54 वर गेली. पवारसाहेब जिद्धीने लढले आणि कार्यकर्ते एक झाले. यामुळे कार्यकर्त्यांनी याची गंभीरता ठेवावी, असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“अखेर मनसे-भाजप युतीवर शिक्कामोर्तब; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पहिली युती जाहीर”
“गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का?; माजी मुख्यमंत्री करणार तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश”
“सोलापूरात मनसेचा झंझावात; नामांकित लोकांनी केला मनसेत प्रवेश”
रद्द झालेली आरोग्य विभागाची परीक्षा आता ‘या’ तारेखला होणार?; राजेश टोपेंनी दिली माहिती