मुंबई : करोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांचं आणि घातलेल्या निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या व रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. रस्त्यांवर अकारण दिसणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई केली जाईल, गरज पडल्यास राज्यात संचारबंदीही लागू केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
राज्य शासनाने आतापर्यंत संयमाने घेतलं, परंतु हा संयम कायम ठेवणे यापुढे शक्य नाही. बंदी आदेशांचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणारंच! ‘कोरोना’ची साथ पसरु नये यासाठी शासन आवश्यक सर्व पावलं उचलेल, अशी हमी यानिमित्तानं देतो, असं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे.
राज्य शासनाने आतापर्यंत संयमाने घेतलं, परंतु हा संयम कायम ठेवणे यापुढे शक्य नाही. बंदी आदेशांचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणारंच! ‘कोरोना’ची साथ पसरु नये यासाठी शासन आवश्यक सर्व पावलं उचलेल, अशी हमी यानिमित्तानं देतो.#CoronaInMaharashtra #maharashtralockdown
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 23, 2020
घराबाहेर पडून रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांमुळे करोनाची साथ पसरण्याचा धोका वाढला आहे. रस्त्यावर गर्दी करणाऱ्या मोजक्या निर्बुद्धांमुळे राज्यातील जनतेच्या जीवाला धोका निर्माण होत आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
राज्यात रक्तसाठ्याचा तुटवडा; रक्तदान करा आरोग्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन
मुख्यमंत्री अतिशय चांगंल काम करत आहेत; राज ठाकरेंनी केलं उद्धव ठाकरेंच कौतुक
भावनिक भाषण करुन काहीही होणार नाही मदतनिधीही गरजेचा आहे- नितेश राणे
महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर; मात्र, ‘ही’ दुकाने राहणार चालू