आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आल्यापासून सत्तेतील तिन्ही पक्षांमध्ये विसंवाद असल्याची टीका भाजपाकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीवरुन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री अजित पवारांना इशारा दिला आहे.
अजित दादा, आमचं ऐका, नाहीतर गडबड होईल, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला. ते पिंपरीचिंडवडमध्ये शिवसेना मेळाव्यात बोलत होते.
पालकमंत्री आपले नाहीत, पण राज्यात आपली सत्ता आहे. पण आपलं इथं कोणी ऐकत नाही असं म्हणतात. मुख्यमंत्री आपले आहेत, पालकमंत्री ही आपलेच आहेत. त्यांनी नाही ऐकलं तर त्यांना सांगावं लागेल. पण मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत आज, पण थोडं थांबा चुकीचं लिहू नका. ते दिल्लीचा अंदाज घ्यायला गेलेत, कारण आम्हाला उद्या दिल्लीवर ही राज्य करायचं आहे. कोण कुठं बसतात हे पाहतायेत, तिथं आपल्याला पोहचायचे आहे. त्याचा अंदाज घेत आहेत. त्यामुळं अजित दादांशी बोलू आपण, आपल्याला एकत्र काम करायचं आहे. ते ऐकतील नाहीतर अवघड होईल, असं संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“मोदींना टक्कर देऊ शकेल असा कोण नेता असेल, तर त्या ममता बॅनर्जी आहेत”
संजय राऊत, पवार कुटूंबाची चाटूगिरी किती करणार, जिभेला आराम द्या; निलेश राणेंचा घणाघात
100 अजित पवार भाजपाला कसे झेपणार?; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा टोला!
शेवटच्या क्षणी पंजाबचा विजय; रंगतदार सामन्यात हैदराबादला 5 धावांनी हरवलं