Home महाराष्ट्र मुख्यमंत्री अतिशय चांगंल काम करत आहेत; राज ठाकरेंनी केलं उद्धव ठाकरेंच कौतुक

मुख्यमंत्री अतिशय चांगंल काम करत आहेत; राज ठाकरेंनी केलं उद्धव ठाकरेंच कौतुक

मुंबई : राज्यात युद्धासारखी परिस्थिती आहे पण या परिस्थितीत मुख्यमंत्री आणि त्यांचं शासन अतिशय चांगंल काम करत आहेत. सरकारी कर्मचारी, डॉक्टर, पोलीस आणि राज्य शासन परिस्थिती अतिशय व्यवस्थित हाताळत आहेत. यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.

करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे. पण आता पुढे जाऊन देशांतर्गत विमान वाहतूकही थांबवायला हवी,  अशी सूचना आपण मुख्यमंत्र्यांना केली, असं राज ठाकरे म्हणाले.

जनता कर्फ्यू म्हणजे एक केस टेस्ट होती. परंतू एक दिवस बंद ठेऊन काम भागणार नाही. दुसऱ्या दिवशी घराबाहेर येऊन फिरण्यासाठी म्हणून जनता कर्फ्यू लावला होता काय? असा सवाल करत  मूठभर लोकांना परिस्थितीचं गांभीर्य नाही, अशा शब्दात राज ठाकरेंनी हिंडफिऱ्या लोकांवर नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भावनिक भाषण करुन काहीही होणार नाही मदतनिधीही गरजेचा आहे- नितेश राणे

महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर; मात्र, ‘ही’ दुकाने राहणार चालू

शरद पवार यांच्या संस्कारामुळे जबाबदारीला प्राधान्य- राजेश टोपे

जातियवादाच्या कोरोनाव कधी आळा बसणार- रामदास आठवले