आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
शारजा : इंडियन प्रीमियर लीग 2021 चा 37 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यामध्ये शारजाह स्टेडियमवर पार पडला.
प्रथम फलंदाजी करताना पंजाबचा संघ निर्धारित 20 षटकार 7 गडी गमावत 125 धावा करू शकला. याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ 20 षटकांमध्ये 7 विकेट्सच्या नुसकानावर 120 धावापर्यंत मजल मारू शकला. पंजाबने शेवटच्या क्षणी 5 धावांनी विजय मिळवला.
पंजाबच्या 126 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्याच चेंडूवर हैदराबादचा पहिला धक्का बसला. पुढे कर्णधार केन विलियम्सननेही एका धावेवर विकेट गमावली. मनिष पांडे आणि केदार जाधव यांनीही खास खेळी करता आली नाही. यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि जेसन होल्डर यांनी चिवट झुंज दिली. पण 17 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर साहा बाद झाला त्याने 31 धावांची खेळी केली.
दरम्यान, होल्डरने डावाखेर नाबाद 47 धावा केल्या. मात्र शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 7 धावांची गरज असताना तो मोठा फटका खेळू शकला नाही आणि पंजाबने सामन्यात बाजी मारली.
हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर संदीप शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि अब्दुल समद यांनीही प्रत्येकी 1 विकेट घेतली. पंजाबकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमी 2 अर्शदीप सिंगने 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी –
पंतप्रधान मोदींचा पेट्रोल पंपावर फोटो; अजित पवारांची खास शैलीत टीका, म्हणाले…
मोदीजी, अमेरिकेतून माझ्यासाठी काहीतरी शाॅपिंग करा- राखी सावंत
लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना आणि आघाडी सरकारला; नवनीत राणा यांचा घणाघात