Home महाराष्ट्र भावनिक भाषण करुन काहीही होणार नाही मदतनिधीही गरजेचा आहे- नितेश राणे

भावनिक भाषण करुन काहीही होणार नाही मदतनिधीही गरजेचा आहे- नितेश राणे

मुंबई :  राज्यात सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र यावरुन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

प्रत्येक स्तरावर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असताना सरकारडून त्यांना आर्थिक मदत दिली गेली पाहिजे. भावनिक भाषण करत असताना लोकांना मदतीचीही गरज आहे, असं म्हणत नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टिकास्त्र सोडलं आहे.

इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकार मदतनिधी जाहीर का नाही करत ? प्रत्येक स्तरावर मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत असून त्यांना राज्य सरकारकडून मदत दिली पाहिजे. भावनिक भाषण करत असताना लोकांना मदतीचीही गरज आहे. शटडाऊन करत असताना मदतनिधीही गरजेचा आहे, असं ट्विट  नितेश राणे यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर; मात्र, ‘ही’ दुकाने राहणार चालू

शरद पवार यांच्या संस्कारामुळे जबाबदारीला प्राधान्य- राजेश टोपे

जातियवादाच्या कोरोनाव कधी आळा बसणार- रामदास आठवले

“सध्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर देवेंद्र फडणवीसांची गरज”