Home महत्वाच्या बातम्या महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर; रेल्वे आणि लोकल नंतर एसटी सेवा ही बंद- मुख्यमंत्री

महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर; रेल्वे आणि लोकल नंतर एसटी सेवा ही बंद- मुख्यमंत्री

मुंबई :  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज रात्री 12 वाजल्यापासून महाराष्ट्रात कलम 144 लागू करण्यात येणार आहे. 31 मार्चपर्यंत हा निर्णय घेत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आाहे.

आजपासून 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. रेल्वे आणि लोकल बंद केल्यानंतर एसटी सेवा देखील बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे.

होम कॉरंटाईनचा शिक्का हातावर असेलेले प्रवासी रेल्वेमधून प्रवास करत असल्याचं निदर्शन आलं होतं. यामुळे कोरोना व्हायरसचा अधिक संसर्ग होऊ शकतो, ही शक्यता होती. त्याच पार्श्वभूमीवर आज रात्री 12 पासून देशात रेल्वेसेवा बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

नरेंद्र मोदींच्या निर्णयाला शरद पवारांची साथ; टि्वटरवर केली ‘ही’ विनंती

जनता कर्फ्यूमध्ये वाढ केली जाऊ शकते- संजय राऊत

“फडणवीस यांनी वेगळ काय केलं असतं, करोना विषाणू गिळून त्यांनी ढेकर दिला असती का?”

शेकहँड टाळा, नमस्कार करा; शरद पवारांच जनतेला आवाहन