आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. यावर आता नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
काल देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यावेळी 12 सदस्यांचं निलंबन रद्द करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं नाना पटोलेंनी यावेळी म्हटलं. तसेच महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यानुसार काम व्हावं, त्यानुसार त्यांच्याकडे ही मागणी केली आहे, असंही नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही दोघं मित्र आहोत. हे जगजाहीर आहे. तेही सर्वांना सांगतात, मीही सांगत असतो. मित्राला मित्र मिठी मारत नाही तर काय दुश्मनाला मारतात? असा सवाल पटोले यांनी केला. या मिठीचा राजकीय अर्थ काही होऊ शकत नाही, असं नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केलं. म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
राज्य मंत्रिमंडळाच्या ‘या’ निर्णयाचा होणार फायदा; राष्ट्रवादी काँग्रेस खाणार भाजपची मते
“शरद पवारांवर खरंच प्रेम असेल, तर जास्तीत जास्त नगरपालिकेत राष्ट्रवादीचे झेंडे फडकवा”
अजितदादा, मुख्यमंत्र्यांसोबत प्रस्ताव बनवा, नरीमन पाॅईंट ते दिल्ली 12 तासात जोडतो- नितीन गडकरी