आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
फलटण : राज्य मंत्रिमंडळाने नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये सध्याची द्विसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या या निर्णयाने फलटण नगरपरिषदेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला याचा मोठा फायदा होईल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रस भाजपाची मते खाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहे.
एकसदस्यीय पद्धतीची निवडणूक राष्ट्रवादीला कठीण गेली असती. द्विसदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असल्याने गेल्या वेळी निवडून आलेल्या नगरसेवकांना एकमेकांची मदत होईल . त्यामुळे फलटण नगरपरिषद निवडणुकीत राजेगटाचे वर्चस्व सध्या दिसत आहे .
दरम्यान, फलटण नगरपरिषदेची मुदत 20 डिसेंबरला संपणार आहे. विद्यमान पदाधिकारी व नगरसेवकांचा कार्यकाळ संपण्यासाठी आता अडीच महिन्याच्या कालावधी शिल्लक उरला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केले आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“शरद पवारांवर खरंच प्रेम असेल, तर जास्तीत जास्त नगरपालिकेत राष्ट्रवादीचे झेंडे फडकवा”
अजितदादा, मुख्यमंत्र्यांसोबत प्रस्ताव बनवा, नरीमन पाॅईंट ते दिल्ली 12 तासात जोडतो- नितीन गडकरी
“…याबद्दल राज्यपाल महोदयांचे आभार मानायला हरकत नाही”