मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या जनता कर्फ्यूला जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या जनता कर्फ्यूमध्ये वाढ केली जाऊ शकते, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
आजची जनता कर्फ्यू ही ट्रायल आहे. खरं तर महाराष्ट्रात आठ दिवसांपूर्वीच कर्फ्यू लावायला हवा होता. कठोरपणे जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करायला हवी होती.लोकांची गर्दी टाळायची असेल तर हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनता कर्फ्यू वाढवू शकतात, असं वाटतं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, लोकांना प्रेमानं आवाहन करून चालणार नाही. कठोर निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी चीनच्या हुकूमशाहीचा आदर्श ठेवावा लागेल, असंही संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“फडणवीस यांनी वेगळ काय केलं असतं, करोना विषाणू गिळून त्यांनी ढेकर दिला असती का?”
शेकहँड टाळा, नमस्कार करा; शरद पवारांच जनतेला आवाहन
सकाळी पत्रकार परिषद घेतली म्हणजे मुख्यमंत्र्यांचं काम संपलं; निलेश राणेंची बोचरी टिका
शरद पवार यांच्या संस्कारामुळे जबाबदारीला प्राधान्य- राजेश टोपे