आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही यावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
“उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी नाही तर पदासाठी तडजोड केली आहे. हे पक्षातील नेत्यांना, आमदारांना आणि शिवसैनिकांनादेखील माहीत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या एखाद्या नेत्याला शरद पवार त्यांचे नेते नाहीत, असे वाटण्यात काहीच चुकीचे नाही, असं नारायण राणे म्हणाले आहेत.
अनंत गीतेंची जी अवस्था आहे, तीच शिवसैनिकांची आहे. कोणीच त्यांना विचारत नाही. पक्षात शिवसैनिकांना आणि आमदारांना कोणीच विचारत नाहीत, किंबहुना मंत्र्यांनाही कोणी काही विचारत नाहीत, असंही नारायण राणेंनी म्हटलंय.
दरम्यान, अनंत गीते यांच्यावर कारवाई केल्याशिवाय ते दुसरे काही करू शकत नाहीत. आणखी ते दुसरे काय करणार. गीते यांना कदाचित फासावर लटकवतील, असा टोलाही नारायण राणे यांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
सव्वा रुपया असो की सव्वा कोटी आत्मसन्मान महत्त्वाचा; संजय राऊतांचा टोला
“कोल्हापूरकरांनी पुन्हा म्हटलं, आमचं ठरलंय, सोमय्यांना एन्ट्री देणार नाहीच”
हसन मुश्रीफांची चिंता पुन्हा वाढण्याची शक्यता; ‘या’ तारखेला किरीट सोमय्या कोल्हापूरला जाणार
भाजपचा शिवसेनेला अणखी एक धक्का; मुंबईत अनेक शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश