Home देश पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता; भाजपचे 10 आमदार फुटणार?

पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता; भाजपचे 10 आमदार फुटणार?

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सध्या तीन विधानसभेच्या पोटनिवडणुका पार पडणार आहेत. मात्र राज्यसभेच्या या पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. या निर्णयावरुन तृणमूल काँग्रेसने भाजपावर निशाणा साधलाय.

भाजपाला पराभवाची भीती असून त्यांचे आमदार फुटले जातील या अनुषंगाने त्यांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप तृणमूल काँग्रेस कडून करण्यात आला आहे .

भाजपमधून आणखी 10 आमदार फुटण्याची भीती त्यांना आहे. त्यामुळे ते  केवळ ट्विट करत आहेत. त्यांनी मैदानात उतरायला हवं, असं टीएमसीचे नेते पार्थ चॅटर्जी म्हणाले.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुष्मिता देव यांना उमेदवारी देत मैदानात उतरविले आहे. भाजपकडून उमेदवारच दिला जाणार नसल्यानं त्या बिनविरोध निवडून येथील हे निश्चित झालं आहे. तृणमूलचे नेते मानस भूनिया हे विधानसभेत निवडून गेल्यानंतर त्यांच्या जागी देव यांना उमेदवारी देण्यात आली आहे .

महत्वाच्या घडामोडी –

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही; नाना पटोलेंचा टोला

शिवसैनिकांची नार्को टेस्ट करा, आवाज येईल, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी नको- सुधीर मुनगंटीवार

“परभणीत शिवसेनेला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश”

शरद पवारांमुळे अजित पवारांना संधी मिळाली पण, त्यांनी ती…; निलेश राणेंची टीका