आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठीही राजकीय नेते पक्षवाढीसाठी कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपनेही राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच दहा, तर शिवसेनेचे चार असे 14 नगरसेवक भाजपमध्ये येतील, असा दावा केला आहे.
2017 मध्ये भाजपमध्ये गेलेले अनेक नगरसेवक घरवापसीच्या तयारीत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं होतं. यावर आमचे नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार तर नाहीत. उलट त्यांचेच दहा नगरसेवक आणि शिवसेनेचे चार असे 14 जण येत्या आठ दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती भाजपचे सभागृह नेते नामदेव ढाके यांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत 2012 ला फक्त तीन नगरसेवक असलेल्या भाजपने 2017 ला 77 पर्यंत बहुमत मिळविले. त्यामुळे 2022 ला आम्ही शंभर प्लस असू आणि पुन्हा सत्ता स्थापन करू, असंही नामदेव ढाकेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
…तर शिवसेनेची किंमत शून्यापेक्षाही कमी- सुधीर मुनगंटीवार
मी लढत असलेली एक प्रकारची क्रांती आहे, मी आता शांत बसणार नाही; सोमय्यांचा ठाकरे सरकारला इशारा
सध्याची ईडीची अवस्था रस्त्यावर चलन काटणाऱ्याप्रमाणे- सुप्रिया सुळे
“शुभमन गिल-वेंकटेश अय्यरची विस्फोटक खेळी; कोलकाताचा आरसीबीवर एकतर्फी विजय”