आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर हे सातत्याने आरोप करताना दिसत आहेत. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर घणाघात केला आहे.
माध्यमं, उद्योगपती आणि विरोधी पक्षातील राजकीय नेते यांच्यावर बेछूट आरोप करुन त्यांना ब्लॅकमेल करण्याचं काम भाजपकडून सुरु आहे, असा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला.
देशात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतक-यांचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अशावेळी बेताल वक्तव्ये आणि बेछूट आरोप, स्टंटबाजी करून भाजप नेते जाणीवपूर्वक लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत., अशी घणाघाती टीका पटोलेंनी यावेळी केली.
किरीट सोमय्यांना त्यांच्या पक्षात किती महत्त्व दिलं जातं, हे मला चांगलंच माहित आहे. पण त्यांना जर खरंच भ्रष्ट्राचार मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर त्यांनी भाजपमधील भ्रष्टाचारी धेंडांना उघडं करावं. मगच त्यांना खऱ्या अर्थाने जनतेचा पाठिंबा मिळेल. फडणवीस सरकारच्या काळातील काही फाईली काढण्याची वेळ आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी स्वत: खाल्ले पण दिसू दिले नाही. किती खाल्ले तेही सांगून जावे. मुख्यमंत्र्यांचा स्वभाव गंमत करण्याचा आहे. त्यांच्या पद्धतीने ते बोलले. पण भाजप नेत्यांना दिवसा सत्तेची स्वप्न पडत आहेत. त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल, असं पटोले म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं गोड स्वप्नं; रूपाली चाकणकरांचा टोला
राष्ट्रवादीत जोरदार इन्कमिंग; पेरणे ग्रामपंचायतीच्या सरपंच्यांसह अनेकांच्या हाती घड्याळ
“देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत; 100 अजित पवारांना खिशात ठेवून फिरतात”
महाराष्ट्रात जे चाललंय ते भयानक; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र