आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीकडून ऑपरेशन कमळ राबवले जात असून, येत्या शुक्रवारी भाजपचे तब्बल 14 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपचे हे आमदार बऱ्याच दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक होते; मात्र पक्षांतरबंदी कायद्यामुळे वेगळ्या गटाचा दर्जा मिळू शकेल इतकी बंडखोरांची संख्या नसल्याने त्यांची आमदारकी जाईल म्हणून हे प्रवेश लांबणीवर पडले होते. परंतु आता आमदारकी रद्द झाली तरी चालेल पोटनिवडणुकीत पुन्हा निवडून येऊ, असे म्हणत या बंडखोर आमदारांनी पक्षांतरची तारीख निश्चित केली आहे.
भाजप सोडणारे बहुतेक आमदार पूर्वाश्रमीचे काँग्रेस-राष्ट्रवादीचेच आहेत. यात काही मूळ भाजपचे असलेलेदेखील आहेत. ही संख्या 12 ते 14 पर्यंत असू शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे तर पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे असणारे आणि काही नवीन असे जवळपास 7 ते 9 भाजप आमदार शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचीही सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, याबाबतची तारीख अजून ठरली नसली तरी राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर एक-दोन दिवसांत शिवसेनेचाही पक्षप्रवेश सोहळा होईल.
महत्वाच्या घडामोडी –
आमचे ‘ऑफर’ काही मैदानात पडलेले नाहीत- देवेंद्र फडणवीस
“ठाण्यात मनसेचं खळखट्याक, कशेळी टोल नाक्याची केली तोडफोड; पहा व्हिडिओ”
किरीट सोमय्यांवर 150 कोटींचा दावा करणार- हसन मुश्रीफ