Home महाराष्ट्र जातियवादाच्या कोरोनाव कधी आळा बसणार- रामदास आठवले

जातियवादाच्या कोरोनाव कधी आळा बसणार- रामदास आठवले

औरंगाबाद : कोरोनाला अटकाव घालण्यास सरकार आणि समाज गुंतले आहेत. तरी शेकडो वर्षांपासून थैमान घालणाऱ्या जातियवादाच्या कोरोनावर सरकारसोबत मिळून समाज कधी आळा घालणार आहे, असा  सवाल यावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा गावात बौद्ध कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यात भीमराज गायकवाड या निर्दोष विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. रामदास आठवले  यांनी संताप व्यक्त केला आहे.

गायकवाड कुटुंबातील मोठ्या मुलाचे आंतरजातीय प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून जातीवादी मानसिकतेतून हा हल्ला आरोपींनी केला असल्याची माहिती समोर आली आहे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करून हल्लेखोरांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा करा, अशी मागणीही रामदास आठवले यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी-

“सध्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर देवेंद्र फडणवीसांची गरज”

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिली दिलासा देणारी ‘ही’ मोठी बातमी

कोरोनाविरोधात एकत्र न येता सोशल मीडियातून एकत्र येऊ म्हणत रोहित पवारांनी शेअर केलं मॅशअप साँग

निर्भया प्रकरण; रितेश देशमुखने ट्विटवरुन केल्या भावना व्यक्त