मुंबई : सध्या महाराष्ट्रात करोनानं थैमान घातलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर विषाणूंचा फैलाव रोखण्याचं मोठं आव्हान आहे. त्यादृष्टीने उद्धव ठाकरे यांनी काही निर्णयही घेतले आहेत. यावर भाजपचे नेते निरंजन डावखरे यांनी उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची गरज आहे, असं निरंजन डावखरे यांनी म्हटलं आहे.
सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची गरज आहे.#MaharashtraNeedsDevendra
— Niranjan Davkhare (@niranjandtweets) March 19, 2020
दरम्यान, निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता.
महत्वाच्या घडामोडी-
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिली दिलासा देणारी ‘ही’ मोठी बातमी
कोरोनाविरोधात एकत्र न येता सोशल मीडियातून एकत्र येऊ म्हणत रोहित पवारांनी शेअर केलं मॅशअप साँग
निर्भया प्रकरण; रितेश देशमुखने ट्विटवरुन केल्या भावना व्यक्त
अखेर न्याय मिळाला; चारही दोषींना फासावर लटकवण्यात आलं