आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीप्रमाणे शनिवारचे बारामीत दौऱ्यावर आहेत. आजही त्यांनी अगदी सकाळी 6 वाजता कामाला सुरुवात केली. सकाळी झालेल्या कार्यक्रमावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. तुम्ही मला कसलीही कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा, असं म्हणत अजित पवारांनी अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं.
आपण इथे आल्यानंतर सकाळी सहा वाजल्यापासून अधिकाऱ्यांना कामे आहेत. अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनीही काम केलं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले. तसेच अजित पवारांनी अधिकाऱ्यांना काही सूचनाही यावेळी केल्या. दिवाळीपूर्वी कामे पूर्ण करा. लागेल तिथे सहकार्य करु. रस्त्याच्या बाजूच्या घरांना पर्यायी जागा द्या. कुणी पेताड खाताड आला तर उद्योग होईल. आपल्या प्रत्येक नागरीकाचा जीव महत्वाचा आहे, असंही अजितदादा म्हणाले.
दरम्यान, अधिकाधिक विकासकामे मार्गी लावून पवारसाहेबांच्या स्वप्नातील बारामती निर्माण करतोय. विकास प्रक्रिया हे एकट्या दुकट्याचं काम नाही. सर्वांनीच यामध्ये सहभागी व्हायला हवं, असं अजित पवारांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“विकासाच्या नावावर शिवसेना औरंगाबादकरांना उल्लू बनवू शकत नाही”
ज्यांना कुणाला आमच्याबरोबर यायचं असेल त्यांनी यावं आणि… ; मुख्यमंत्र्यांनंतर राऊतांचीही भाजपला टाळी
“राज ठाकरेंनी दिला आजोबा प्रबोधनकार ठाकरेंच्या आठवणींना उजाळा”