आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहन करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी, आज ज्याने ज्याने मला धन्यवाद म्हणून बोर्ड दाखवले, त्यांना मला सांगायचं आहे की, आमचा विकास आता सुरु झाला आहे, आणि अजून खूप होणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया देत हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री महोदयांनी भाषण देऊन स्पष्ट केलं की शिवसेना पक्ष, माजी खासदार आणि 14 कर्तृत्वान महापौरांनी मागच्या 30 वर्षांपासुन ते आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा विकास न करता फक्त औरंगाबादकरांची फसवणुक केलेली आहे, अशी टीका जलील यांनी यावेळी केली.
दरम्यान, औरंगाबाद शहरात विकास कामं झाली नसल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच विकासाच्या नावावर शिवसेना आता औरंगाबादकरांना उल्लू बनवू शकत नाही, असंही जलील यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
ज्यांना कुणाला आमच्याबरोबर यायचं असेल त्यांनी यावं आणि… ; मुख्यमंत्र्यांनंतर राऊतांचीही भाजपला टाळी
“राज ठाकरेंनी दिला आजोबा प्रबोधनकार ठाकरेंच्या आठवणींना उजाळा”
धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ वकतव्याकडे मी निव्वळ विनोद म्हणून पाहते; प्रीतम मुंडेंचा टोला