Home महाराष्ट्र कोरोनाविरोधात एकत्र न येता सोशल मीडियातून एकत्र येऊ म्हणत रोहित पवारांनी शेअर...

कोरोनाविरोधात एकत्र न येता सोशल मीडियातून एकत्र येऊ म्हणत रोहित पवारांनी शेअर केलं मॅशअप साँग

मुंबई : सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. भारतातही या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी अनेक उपायोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

कोरोनाविरोधात लढताना प्रत्यक्षात एकत्र न येता सोशल मीडियातून एकत्र येऊ. लोकांमधील भीती दूर करून जागृती करण्यासाठी रोज सकाळी 9 वाजता कोरोनाबाबत जनजागृती करणारी बातमी/माहिती मी सोशल मीडियातून शेअर करणार आहे. तुम्हीही शेअर करा. मित्राने बनवलेला असाच एक व्हिडिओ मी शेअर करतोय, असं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही यापूर्वी जनजागृतीसाठी एक व्हिडीओ शेअर केला होता.

महत्वाच्या घडामोडी-

निर्भया प्रकरण; रितेश देशमुखने ट्विटवरुन केल्या भावना व्यक्त

अखेर न्याय मिळाला; चारही दोषींना फासावर लटकवण्यात आलं

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर आज गावोगावी तिरड्या उठल्या असत्या; राष्ट्रवादीचा फडणवीसांना टोला

राज्य सरकार करोनाशी सामना करतंय, तर देवेंद्र फडणवीसंचे समर्थकांनी राजकारण