आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : जालन्याच्या परतूर तालुक्यातील येनोरा येथील सदाशिव भुंबर या तरूणाने आत्महत्या केली. यावरुन छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज्य सरकारला आवाहन केलं आहे.
सरकारने आता तरी जागे व्हावे अस सांगतानाच परतूर तालुक्यातील येनोरा येथील सदाशिव भुंबर या तरूणाने मराठा समाजाला आरक्षण नाही, रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत, यामुळे नैराश्यातून आत्महत्या केली. आर्थिक दारिद्रयामुळे मराठा समाजातील तरूण मुख्य प्रवाहातून बाहेर पडला आहे. या तरूणांना सक्षम करण्यासाठी आम्ही समाजाच्या वतीने शासनाकडे आरक्षणासह सारथी संस्था, आण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या माध्यमातून उच्चशिक्षण, कौशल्य विकास, रोजगार व व्यवसाय उपलब्धता यांसारख्या इतर अनेक मागण्या केलेल्या आहेत. त्यासाठी अनेकवेळा पाठपुरावा, आंदोलने केली. मात्र शासनाकडून त्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही. वेळोवेळी समाजाच्या पदरी निराशाच पडत आहे, असं संभाजीराजेंनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आरक्षण नाही, रोजगाराच्या संधी नाहीत, व्यवसायासाठी पाठबळ नाही यामुळे अनेक मराठा तरूण नैराश्यात जात आहे. त्या न्यूनगंडातूनच आत्महत्येसारखे पाऊल उचलले जाते. देशाचे भविष्य असणारी तरूण पिढी अशा परिस्थितीत जाणे, हे राष्ट्रास अहितकारक आहे, असंही संभाजीराजे भोसले म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
सर्व निवडणुकीसाठी अध्यादेश लागु होईल याची खात्री सरकार देईल का?; पंकजा मुंडेंचा सवाल
भाजपाला आंदोलनाची नौटंकी करून पाप झाकता येणार नाही; ओबीसी अरक्षणावरुन नाना पटोलेंचा हल्लाबोल
मग आपली पोलीस फौज सरकारने 100 कोटी मोजण्यासाठी ठेवली आहे का?; चित्रा वाघ यांचा सवाल
आघाडी सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला; गोपीचंद पडळकरांची टीका