Home महाराष्ट्र आघाडी सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला; गोपीचंद पडळकरांची टीका

आघाडी सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला; गोपीचंद पडळकरांची टीका

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राज्य सरकारने ओबीसींना आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका घेऊ नये, या ,मागणीसाठी आज भाजपतर्फे राज्यभरात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं.

सुप्रीम कोर्टाने ओबीसी समाजाचा सर्वे करून इम्पेरिकल डेटा गोळा करण्याच्या सूचना आघाडी सरकारला केली होती. परंतु यांनी केवळ केंद्राकडे बोट दाखवण्याचे काम केले. मंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी केवळ वेळकाढूपणा केला आणि या महाराष्ट्रातील ओबीसींचा विश्वासघात केला आहे, अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली.

आघाडी सरकारनं सुप्रीम कोर्टात कुठलीही ठोस भूमिका मांडली नाही. आरक्षण जाण्याला आघाडी सरकार 100 टक्के जबाबदार आहे. सुप्रीम कोर्टाने एवढं सांगितलं असतानाही आघाडी सरकारनं केंद्रानं इम्पेरिकल डाटा द्यावा सेल्सस डेटा की इम्पेरिकल डेटा यामध्ये घोळ घातला. आणि आता महाराष्ट्रातील ओबीसींवर ही वेळ आणून ठेवली, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

सुप्रीम कोर्टानं सांगितलं होते की इम्पेरिकल डेटा गोळा करा, फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षान देताना राज्यातील मराठा समाजाचा सर्वे करून चार महिन्यात इम्पेरिकल डेटा गोळा करून उच्च न्यायालयात दाखल केला होता. पण ते आघाडी सरकारने ते काम केले नाही, अशी माहितीही गोपीचंद पडळकर यांनी यावेळी दिली.

दरम्यान, पुण्यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत आणि भाजप ओबीसी सेल महाराष्ट्र राज्य आणि भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले गेले.

महत्वाच्या घडामोडी –

माफी मागा, अन्यथा…; सुरेखा पुणेकरांचा प्रविण दरेकरांना इशारा

“सांगलीतील महिला व्यावसायिकाला लुबाडलं, दुबईतील कंपनीकडून दीड कोटींची फसवणूक”

मुंबई पोलिसांना त्यांच्या मर्जीनुसार काम करू द्या, राजकारण करू नका- दिलीप वळसे पाटील

भाजपने किरीट सोमय्यांना ईडीचं प्रवक्तेपद द्यावं; रोहित पवारांचा टोला