सांगली : द्राक्ष आणि डाळिंब निर्यात करणाऱ्या सांगलीच्या महिला व्यापाऱ्यास दुबईतील कंपनीने तब्बल 1 कोटी 36 लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चाैघांना अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पौर्णिमा पाटील या सांगलीतील उत्तर शिवाजी नगर येथे कुटुंबासह राहतात. त्यांची पीव्हीआयपी एक्सपोर्ट एलएलपी सांगली या नावाने आयात-निर्यात करणारी कंपनी आहे. तांदूळ, नारळ, द्राक्ष या मालाची खरेदी करून ते निर्यात करतात.
2019 मध्ये दुबईतील ओपीसी फुडस्टफ कंपनीचा पर्चेस ऑफिसर माजीद जलाल याने मोबाईलवरुन संपर्क साधून मालाची चौकशी केली. त्यानंतर पौर्णिमा यांनी कंपनीविषयी सर्व माहिती दिली. त्यावेळी दिलीप जोशी हा मुंबई परिसरासाठी काम पहात असल्याचे जलाल याने सांगितले. त्यानंतर पौर्णिमा यांनी पतीसह डिसेंबर 2019 मध्ये जोशी याची मुंबईत भेट घेतली. तसेच संशयित मंगेश गांगुर्डे हा भारतातील काम पाहत असल्याने त्याचीही ओळख झाली. त्यानंतर फिर्यादी हे जलाल आणि कंपनीला भेट देण्यासाठी दुबईला गेले. त्यावेळी कंपनीचा मालक मुहम्मद फारुक, बद्र अहमद हुसेन यांच्यासोबत त्यांची ओळख झाली.
माल निर्यातीसाठी 50 टक्के रक्कम आगाऊ आणि मालाचे कंटेनर ‘युएई’मध्ये मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचा व्यवहार ठरला. त्यानुसार जानेवारी 2021 मध्ये पाटील यांना ऑर्डर मिळाली. द्राक्षाचे चार आणि डाळिंबाचे तीन असे सात कंटेनर निर्यात करण्यात आले. त्याची किंमत जवळपास 1 कोटी 57 लाख रुपये इतकी होती. त्यापैकी 30 टक्के रक्कम फिर्यादी यांना देण्यात आली. तसेच उर्वरित रक्कमेसाठी जलाल यांच्याशी संपर्क केला त्यावेळी त्याने चालढकलपणा करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, पौर्णिमा पाटील यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार दुबईतील कंपनीच्या दोघा मालकांसह, मुंबईतील दोघा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
मुंबई पोलिसांना त्यांच्या मर्जीनुसार काम करू द्या, राजकारण करू नका- दिलीप वळसे पाटील
भाजपने किरीट सोमय्यांना ईडीचं प्रवक्तेपद द्यावं; रोहित पवारांचा टोला
सांगलीमध्ये खाजगी कार्यालयात लसीकरण न केलेला स्टाफ आढळून आल्यास कार्यालये सील करणार- नितीन कापडणीस
“उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची”