नवी दिल्ली : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना टार्गेट करून त्यांचे भ्रष्टाचार काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक नेत्यांना ईडीच्या नोटीसा येत आहेत. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत सोमय्यांना टोला लगावला आहे.
भाजपने किरीट सोमय्या यांना ईडीचं प्रवक्तेपद द्यावं, असा टोमणा रोहित पवारांनी यावेळी लगावला आहे. रोहित पवार 2 दिवस दिल्ली दाैऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी टी.व्ही.9 मराठीशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.
सोमय्यांना भाजपने एक ऑफिशियल पोस्ट द्यावी. ईडीचे प्रवक्ते अशी काही तरी पोस्ट त्यांना द्यावी. आता त्यांच्याकडे एक प्रतिनिधी एवढंच पद आहे. त्यांना प्रवक्ते केले तर ते ईडीचे प्रतिनिधी आहेत हे ऑफिशियल होऊन जाईल. ईडींना कळायच्या आधी त्यांना बऱ्याच गोष्टी कळत असतात. त्यांच्यावर टीव्हीचा फोकसही असतो, त्यामुळे त्यांना हे पद द्यायला हरकत नाही, असा टोमना रोहित पवारांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
सांगलीमध्ये खाजगी कार्यालयात लसीकरण न केलेला स्टाफ आढळून आल्यास कार्यालये सील करणार- नितीन कापडणीस
“उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची”
“राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता उदयनराजेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण”
राष्ट्रवादीकडे कुठले मुद्दे नाहीत, त्यामुळे…; दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन फडणवीसांची टीका