आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतवर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या फौजदारी तक्रारीवर अंधेरी कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी कंगना रणौत उपस्थित नसल्याने कोर्टाने संताप व्यक्त करत पुढील सुनावणीला कंगना रणौत गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट काढू असं स्पष्ट केलं आहे.
जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या फौजदारी तक्रारीची दखल घेत अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी सुरू केलेली कारवाई रद्द करण्याची कंगनाची मागणी उच्च न्यायालयाने गुरूवारी फेटाळली होती.
दरम्यान, कारवाई सुरू करण्याचा महानगरदंडाधिकाऱ्यांचा आदेश बेकायदा नाही, त्यात अनियमितता नाही. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं न्यायालयाने नमूद केलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्याने कंगनाने अंधेरी कोर्टात हजर होणं आवश्यक होतं.
Siddiquee: Your lordship may give me a short date. The circumstances may be considered.
— Bar & Bench – Live Threads (@lawbarandbench) September 14, 2021
महत्वाच्या घडामोडी –
…तर मी राजीनामा द्यायला तयार आहे- विजय वडेट्टीवार
आमदार रोहित पवारांनी घेतली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट
ठाकरे सरकारकडून बेरोजगारांसाठी मोठी संधी; 17 हजार 372 बेरोजगारांना मिळाला रोजगार
“दरेकरांच्या मनात अश्लील अर्थ नव्हता, त्यामुळे उगीच पराचा कावळा करू नये”