आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाकडून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना लक्ष्य केले जात आहे. यावर वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटत असेल तर राजीनामा देतो, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वच राजकीय पक्षांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी यावेळी केला. ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, 5 जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार आहेत. याला केवळ काँग्रेस पक्ष जबाबदार नाही. याला भाजपही जबाबदार आहे. हे त्यांनी मान्य करावे. ओबीसींचे आरक्षण रद्द होण्याला महाविकास आघाडीचे सरकार जबाबदार असल्याचे त्यांना वाटत असेल तर ते जनतेची दिशाभूल करत आहेत. ओबीसींच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम ते करत आहे. तत्कालीन सरकारने पाठवलेले ते सहा पत्रं त्याचा पुरावा आहे, असंही वडेट्टीवार यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
आमदार रोहित पवारांनी घेतली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट
ठाकरे सरकारकडून बेरोजगारांसाठी मोठी संधी; 17 हजार 372 बेरोजगारांना मिळाला रोजगार
“दरेकरांच्या मनात अश्लील अर्थ नव्हता, त्यामुळे उगीच पराचा कावळा करू नये”