Home देश आमदार रोहित पवारांनी घेतली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट

आमदार रोहित पवारांनी घेतली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांची  भेट घेतली.

कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक प्रभाव हा असंघटीत क्षेत्रातील महिला आणि कामगारांवर पडला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ग्रामीण भागातील गरिबीचा सापळा तोडण्यात यशस्वी सिद्ध झाला आहे, यामुळे ग्रामीण दैनंदिन मजुरी करणाऱ्या कामगारांचे राहणीमान सुधारले आहे. ग्रामीण भागातील क्रयशक्ती वाढल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणे, लिंग समानता सुधारणे, स्थानिक राजकारणात सहभाग वाढवणे, सार्वजनिक संपत्ती वाढवण्यास मदत झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांना व्यापक आणि खात्रीशीर रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि त्यांच्यासाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम सुरू करावा यासाठी आमदार रोहित यांनी निर्मला सीतारमन यांची भेट घेतली.

दरम्यान, शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम राबविण्याबाबत आणि कर्जत- जामखेडमध्ये इतर आर्थिक घडामोडी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकाधिक व्यवहार वाढण्यासाठी नवीन बँकाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन यावेळी निर्मला सीतारमन यांनी दिल्याचं आमदार रोहित पवार यांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

ठाकरे सरकारकडून बेरोजगारांसाठी मोठी संधी; 17 हजार 372 बेरोजगारांना मिळाला रोजगार

“दरेकरांच्या मनात अश्लील अर्थ नव्हता, त्यामुळे उगीच पराचा कावळा करू नये”

अतुल भातखळकरांचं डोकं फिरलंय, मुख्यमंत्र्यांविरोधात दाखल केलेल्या तक्रारीवरून मनिषा कायंदे यांचा घणाघात

खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाचं केलं स्वागत, म्हणाल्या…