Home महाराष्ट्र “गुजरात जर विकासाच्या मार्गावर होतं, तर रातोरात मुख्यमंत्री का बदलला?, हेच का...

“गुजरात जर विकासाच्या मार्गावर होतं, तर रातोरात मुख्यमंत्री का बदलला?, हेच का गुजरात माॅडेल?”

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भूपेंद्र पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. भाजपने त्यांची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये मागील सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलले आहेत. यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून निशाणा साधला आहे.

गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली?, हेच का गुजरात माॅडेल?, असा सवाल सामनातून करण्यात आला.

दरम्यान, कुठं काय बदलायचं हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. भाकरी ही फिरवावीच लागते, पण एखादे राज्य जेव्हा विकास किंवा प्रगतीचे ‘मॉडेल’ असल्याचे आदळआपट करीत सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की, मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात, असं सामनात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

बलात्काऱ्याला आमच्या ताब्यात द्या, इथं न्याय होणारच! मनसे नेत्या रूपाली पाटील संतापल्या

राज्य सरकारनं ओबीसी समाजाची दिशाभूल केली; बावनकुळेंचा घणाघात

प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा…; रुपाली चाकणकरांचा इशारा

‘सरकार नावाची व्यवस्था अस्तित्वात आहे का?’; चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल