मुंबई : सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. भारतातही या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी अनेक उपायोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा आपल्या फेसबुक पेजवरुन महत्वाचे आवाहन केलं आहे.
आतापर्यंत आपण कोरोनाला जास्त फैलावू न देण्यात यशस्वी झालो आहोत. कोरोना एकमेकांच्या सहवासातून होतो. म्हणून आपण जर कमी वेळा एकमेकांच्या जवळ गेलो आणि हे सुमारे दोन आठवडे केलं तर हा रोग पसरणार नाही असे राज ठाकरेंनी सांगितलं आहे.
आपण ज्या भागात रहातो तिथे लोक गोंधळलेल्या अवस्थेत असू शकतात. तिथे त्यांना दिलासा द्यायला पाहिजे. तिथे माहितीची कमी असेल, साधन-सोयींची कमतरता असेल तर योग्य ते करावे. असही राज ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“हा शिवरायांचा लढणारा महाराष्ट्र आहे, या संकटावर मात केल्या शिवाय राहणार नाही”
घाबरु नका, घाबरुन युद्ध जिंकता येत नाही : मुख्यमंत्री लाईव्ह
‘करोना’ संशयितांची नाव उघड केल्याप्रकरणी मनसेच्या नेत्यावर गुन्हा दाखल
पंकजा मुंडेंनी सुरू केलेल्या ऑनलाइन बदली धोरणाला राष्ट्रवादीचा खो