Home महाराष्ट्र कृष्णा नदीची पाणी पातळी उद्या 33 ते 35 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता; पाटबंधारे...

कृष्णा नदीची पाणी पातळी उद्या 33 ते 35 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता; पाटबंधारे उपअभियंता लालासाहेब मोरेंनी दिली माहिती

सांगली : सायंकाळी कोयना धरणातून 50 हजार क्युसेस विसर्ग करण्यात आला असून इतर धरणातून सुमारे 10 हजार क्युसेस विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे मुक्त पाणलोट क्षेत्रातील सुमारे 10 ते 12 हजार क्युसेस असा एकूण 70 ते 75 हजार क्युसेस विसर्ग नदी पात्रात मिसळनार आहे.

कृष्णा नदी पाणी पातळीत वाढ होऊन उद्या सकाळपर्यंत पाणी पातळी 28 फुट आणि उद्या रात्री उशीरा 33 ते 35 फुटांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या नागरीकांनी सावधानता बाळगावी, असं आवाहन इस्लामपूर जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता लालासाहेब मोरे यांनी केले आहे.

दरम्यान, सद्यास्तिथीत नागरीकांनी घाबरुन न जाता सावधानता बाळगावी, असेही लालासाहेब मोरे यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या घडामोडी –

रस्ते घोटाळ्याप्रकरणी चंद्रकांत पाटलांविरोधात FIR दाखल करणार- हसन मुश्रीफ

“काँग्रेसचे राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”

“किरीट सोमय्यांकडून आरोपांच्या मालिका सुरूच, हसन मुश्रीफांवर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप”

“राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच, वंचितचा ‘हा’ मोठा नेता बांधणार हाती घड्याळ”