Home महाराष्ट्र साकीनाका बलात्कार प्रकरण; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या मुख्यमंत्र्यांकडे ‘या’ चार मागण्या

साकीनाका बलात्कार प्रकरण; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या मुख्यमंत्र्यांकडे ‘या’ चार मागण्या

मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात पुन्हा एकदा दिल्लीतील निर्भयासारखा प्रकार घडला. एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या  नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक निवदेन दिले आहे. त्यात गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना 4 महत्वाचे सल्ले दिले आहेत.

 नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या महत्वाच्या सूचना

1) मुंबईतील लोकल मधील महिलांना होणाऱ्या त्रास बाबत सीसीटीव्ही संख्या वाढविणे, गस्ती वाढविणे, वारंवार घटना घडणाऱ्या ठिकाणी लाईट लावणे, सीसीटीव्ही लावणे, टोल फ्री क्रमांकाचा प्रभावी वापर करणे. अशा सूचना दिल्या होत्या. या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी होणे करिता महिलांच्या सुरक्षितते बाबत केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे ,सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करणे करीता आपण रेल्वे चे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेऊन सूचना द्याव्यात. पुणे, ठाणे, सातारा येथील रेल्वेच्या हद्दीत झालेल्या विविध घटनां मुळे याची आवश्यकता जाणवते.

2) प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला दक्षता समिती स्थापन करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्या सर्व पुनर्गठीत केल्या असून त्या महिलांना कामाचे स्वरूप,समितीचे अधिकार व कर्तव्ये समजावीत म्हणून प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. याबाबत पोलीस प्रशासनास आवश्यक सूचना निर्गमित कराव्यात.

3) पॉक्सो कायद्याअंतर्गत प्रलंबित केसेस तात्काळ निकाली काढण्यासाठी फिरती फास्टट्रॅक न्यायालये व फिरती न्यायालये कार्यान्वित करण्यात यावीत. पॅरोल वर सुटलेल्या पॉक्सोच्या गुन्हेगारांबाबत आढावा घेण्यात यावा. शक्ती कायदा पारित होईपर्यंत त्यामधील तरतुदी प्रमाणेच, सर्व पोलिस यंत्रणांनी, प्रचलित कायद्यानुसार तात्काळ अंमलबजावणी करावी असे निर्देश द्यावेत.

4) पोस्कॉ अंतर्गत गुन्ह्यामध्ये शासनाने अत्याचार पीडित महिलेला तात्काळ मदत मिळावी म्हणून मनोधैर्य योजना सुरू केली. सदर योजनेत पीडित महिलेला किंवा बालकाला मनोधैर्य योजनेचा लाभ मिळणेस भरपूर कालावधी लागतो. हा कालावधी कमी करणे आवश्यक असून हा कालावधी 7 दिवसांचा करणेबाबत संबंधित विधी व न्याय विभागाला आदेशीत करावे.

महत्वाच्या घडामोडी –

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी सरकार घेणार; एकनाथ शिंदेंची माहिती

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू; प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांना अश्रू अनावर

“गुजरातच्या राजकीय वर्तकुात भूकंप, मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा”

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू; संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…