मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. राज्यात कोरोनाचे 40 रुग्ण अढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर महेश कोठारे यांच्या ‘तात्या विंचू’ने त्याच्या अंदाजात संदेश दिला आहे.
ओम भट स्वाहा करूयात या करोना व्हायरसचा’ असं तात्या विंचू या व्हिडीओत म्हणतोय. हा व्हिडीओ महेश कोठारे यांनी शेअर केला आहे.
मेहरबान कदरदान करोना व्हायरससे है पुरी दुनिया परेशान… हा करोना व्हायरस खुद्द तात्या विंचूपेक्षा खतरनाक निघाला. लोकांची झोप उडवून ठेवली या करोना व्हायरसने.. म्हणून मित्रांनो..आपण सगळ्यांनी मिळून या करोना व्हायरसचा खात्मा करूया.. म्हणजे ओम भट स्वाहा करून टाकूया या कोरोना व्हायरसचा.
म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा.. बाहेर जाताना मास्क घाला.. जास्त गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका… गरज नसताना उगाच बाहेर पडू नका.. आणि सगळ्यात महत्त्वाचं या करोना व्हायरसबद्दल अफवा पसरवू नका.. नाहीतर करून टाकीन ओम भट स्वाहा.., असं आवाहनही केलं.
#TatyaVinchu On #CoronaVirus asks people to stop spreading rumours #ramdaspadhye #satyajitpadhye #maheshkothare @abpmajhatv @bbcnewsmarathi @MarathiRT @marathimovies @PlanetMarathi @marathifilmwala @RajshriMarathi @CafeMarathi @LoksattaLive @mataonline @soumitrapote @MiLOKMAT pic.twitter.com/12APsoTRU9
— Satyajit Ramdas Padhye (@satyajitpadhye) March 18, 2020
महत्वाच्या घडामोडी-
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांना समन्स; 4 एप्रिल रोजी आयोगासमोर हजर राहण्याचा आदेश
…तर आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील; मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांना इशारा
करोनाची लागण झालेले रुग्ण आरोपी नाहीत, त्यांची नावं जाहीर करा; मनसेची मागणी
“…तेव्हाच आशेचा एक किरण ही आपल्या आयुष्यात येतो”