मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय दोन्ही क्रिकेट बोर्डांनी एकमेकांच्या सहमतीने घेतला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफॉर्ड मैदानात पाचवा कसोटी सामना खेळवला जाणार होता. दोन्ही संघासाठी ही कसोटी निर्णायक व महत्वाची होती. पण कोरोनाच्या संकटामुळे दोन्ही क्रिकेट बोर्डांनी एकमेकांच्या सहमतीने ही कसोटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच ICC नं ट्विट करत याबाबत माहिती दिली.
दरम्यान, चौथी कसोटी सुरु असताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. तसेच खेळाडूंना हॉटेल रुमबाहेर पडण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. यामुळे पाचवी टेस्ट खेळवण्याबाबतही शंका निर्माण केली जात होती. आणि अखेर आज होणारी पाचवी कसोटी रद्द करण्यात आली आहे.
The ECB and BCCI have mutually decided to call off the fifth #ENGvIND Test, which was due to begin today.
Details https://t.co/MIAkhQodzK
— ICC (@ICC) September 10, 2021
महत्वाच्या घडामोडी –
प्रशांत किशोर यांच्या मदतीची मला कोणतीच गरज नाही- शरद पवार
“नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि पुत्र नितेश राणे यांना लुकआऊट नोटीस जारी”
“भाजप करुणा शर्मा यांच्या पाठीशी, त्यांच्यासाठी आंदोलन करण्याबाबत भाजप विचार करेल”